वृत्तसंस्था
पुणे : ट्रक- दुचाकी अपघातात पुण्यातील एका महिला बॅडमिंटनपटूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली चिरडून तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला होता. Badminton player Kashmira Bhandari Accidental death in Pune
काश्मीरा प्रशांत भंडारी ( वय २०), असे तिचे नाव आहे. ती दुचाकीवरून एका ट्रकला ओव्हरटेक करत होती. त्यावेळी ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर ट्रकचालक पळून गेला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
सातारच्या हिरकणीचा झाला अपघाती मृत्यू , अर्धापूर तालुक्यात ट्रकला धडक , मोहीम राहिली अर्धवट
दरम्यान, प्रशांत भंडारी , हे पुण्यातील प्रसिद्ध फटाके व्यापारी आहेत. काश्मीरा ही त्यांची मुलगी आहे. पुण्यातील लक्ष्मी नारायण चौकातून ती दुचाकीवरून जात होती. तेव्हा तिच्या पुढे कचऱ्याची वाहतूक करणारा ट्रक धावत होता. त्या ट्रकला तिने डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्यास सुरुवात केली.
पण, डाव्या बाजूला एक मोटार अगोदरच पार्क करून ठेवली असल्याने तिने ब्रेक मारला. त्यामुळे दुचाकी घसरून ट्रकच्या चाकाखाली गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App