खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात दिलं उत्तर.
विशेष प्रतिनिधी
पुणे : संजय राऊत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते त्यांच्या बेधडक विधानामुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात. राऊत नेमकेच छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध कार्यक्रम “खूपते तिथे गुप्ते” या कार्यक्रमात आले होते. झी मराठीवर सुरू असणारा हा ‘ खुपते तिथे गुप्ते’ चा तिसरा सिझन सध्या चांगलाचं लोकप्रिय आहे. Avdhut Gupte is new show khupte thithe gupte.
या पर्वाची सुरुवात राज ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली होती . निवेदक अवधूत गुप्ते याने त्याच्या खूमासदारशैलीत राज ठाकरेंना बोलत केलं होतं. यानंतर नारायण राणे यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. मुलाखतीचा उत्तम कार्यक्रम असणाऱ्या या कार्यक्रमात निवेदक येणाऱ्या पाहुण्यांना बोलत करतो . आणि त्यांच्यावर असणाऱ्या आरोपांबाबत प्रश्न विचारतो. त्यांना नेमकं काय होतं खुपत ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याचदा उलगडल्या जातं.
View this post on Instagram A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
येणाऱ्या आठवड्यात प्रसारित होणाऱ्या भागात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. संजय राऊत यांना झालेल्या अटकेपासून. ते सामनाच्या अग्रलेखापर्यंत सगळ्याच प्रश्नांवर चर्चा झालेली दिसतीय. याच दरम्यान राज ठाकरे चा राजीनामा तुम्ही लिहिला होता का या आरोपवार बोलते झालेतं. ते म्हणाले त्या काळातील राज ठाकरे व माझी मैत्री ही जगजाहीर होती. आम्ही एकमेकांकडे अनेक भावना व्यक्त करायचो.
त्यांच्या मनात काय आहे, हे मला माहीत होतं. याविषयी आम्ही बाळासाहेब ठाकरेंशीही चर्चा केली होती. पण ही कुटुंबात पडलेली फूट आहे. तेव्हा माझ्यावर तुम्ही राज ठाकरेंच्या फार जवळ आहात, असा आरोप व्हायचा. मी पक्षाचा किंवा उद्धव ठाकरेंचा मालक नाही. मी अनेकांच्या जवळ आहे. त्यांच्याबरोबरची नाती मी टिकवून ठेवली, हे अनेकांना खुपतं.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App