विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.Atul Bhatkhalkar’s criticism that Mughal came back from the grave in the state of the Thackeray government
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावर ट्विटद्वारे टीका करताना भातखळकर यांनी म्हटले आहे की, या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका क्रीडासंकुलाची स्वागत कमान दिसत आहे.
या कमानीवर वीर टिपू सुलतान क्रीडासंकुलाचे काम पालकमंत्री अस्मल शेख यांच्या निधितून झाल्याचा उल्लेख आहे. या फोटोला भातखळकर यांनी एक कॅप्शन देखील दिले आहे. ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App