विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या वेळी डॉक्टर आणि परिचारिकांचा अक्षम्य हलगर्जीपणा पोलीस अधीक्षकांनीच सांगितला आहे. आग लागल्यानंतर पहिल्या दहा मिनिटांत रुग्णांना वाचवणे शक्य होते. पण कोणीही एक रुग्ण तर स्वत:चे व्हेंटिलेटर मास्क काढून फरफटत बाहेर आला. पण ज्यांना ते जमले नाही त्यांना प्राण गमवावे लागले.Attempts to evacuate patients on ventilator but no one came forward to save the fire, Superintendent of Police said unforgivable negligence at the city hospital
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना अटक केली. त्यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्यातील प्राथमिक तपासाबाबत माहिती दिली.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वेळेत मदत झाली असती तर काही जीव वाचले असते. तेथे नियुक्त डॉक्टर व नर्स यांनी रुग्ण बाहेर काढण्यासाठी पहिल्या दहा मिनिटांत प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या कामातील या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. पोलिसांनी घटनेनंतर तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यात आढळलेल्या पुराव्यांवरून चौघांना अटक केली आहे.
घटनेच्या दिवशी अतिदक्षता कक्षात दोन डॉक्टर व तीन परिचारिका अशा पाचजणांची नियुक्ती होती. परंतु आग लागली तेव्हा यातील चार कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी हजर नव्हते. आग लागल्यानंतर पहिल्या दहा मिनिटांत रुग्णांना वाचवणे शक्य होते. सुरुवातीला कक्षातून केवळ धूर निघत होता. आग तेवढ्या तीव्रतेने नव्हती. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक सहज आत जाऊन काही रुग्णांना बाहेर आणत होते. एक रुग्ण तर स्वत:चे व्हेंटिलेटर मास्क काढून फरफटत बाहेर आला.
एवढा वेळ जाऊनही नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणीही रुग्णांना वाचवण्यासाठी गेले नाही, असे सीसीटीव्हीतील फुटेजवरून व जाब-जबावावरून सिद्ध होते. हा कामातील हलगर्जीपणा आहे. प्राथमिक तपासात ही गोष्ट समोर आली. त्यामुळेच या चौघांना अटक करण्यात आल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
राज्य शासनाने या घटनेला जबाबदार धरून जिल्हा शल्य चिकित्सकांसह दोन वैद्यकीय अधिकारी व चार परिचारिका अशा सहा जणांवर कारवाई केली आहे. परंतु पोलिसांनी यातील केवळ चौघांनाच अटक केली आहे.
मग यातील जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्यावर काही कारवाई होणार का? असे पत्रकारांनी विचारल्यानंतर अधीक्षक पाटील म्हणाले की, सद्यस्थितीत हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे चौघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. इतरांविरूद्ध पुरावे आढळले तर त्यांच्यावरही कारवाई होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App