विशेष प्रतिनिधी
बारामती : सैतानाचा अवतार समजून महिलेला नग्न पूजा करायला भाग पाडून तिचा बळी देण्याचा प्रयत्न बारामती तालुक्यातल्या करंजेपूल येथे झाला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या सासरकडील चौघांसह एका मांत्रिकाविरोधात नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.Attempting to murder a woman by forcing her to worship naked by understanding the incarnation of witch
महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड (सर्व रा. करंजेपूल, ता. बारामती), नणंद निता जाधव (रा. चाकण, ता. खेड) व तात्या (मांत्रिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह झाल्यापासून सासू व दिराकडून लग्नात हुंडा जादा दिला नाही या कारणावरून सतत छळ केला जात होता. वारंवार मारहाण देखील केली जात होती. याचवेळी नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही महिलेचा छळ सुरु केला
काही दिवसापूर्वी दोन्ही दीर व सासूने तिला भूतबाधा झाली असल्याचे पसरवत तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले. त्याच्या सांगण्यानुसार आरोपींकडून लिंबू उतरणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे अघोरी प्रकार करण्यास सुरुवात केली.
पीडित महिलेला मुलगी झाल्यानंतर सासूने तिला हाकलून देण्याचा प्रयत्नही केला. 15 ऑक्टोबर 2021 रोजी दोन्ही दीर व सासू यांनी घरात कोणीही नसल्याचे पाहून तिला मारहाण केली. महिलेचे डोके भिंतीवर आपटून लाकडी दांडके, लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. तू सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देऊ असे म्हणत तिचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी महिलेने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. पण त्याच दिवशी दीर व सासूने तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावून घेतले. हळदी-कुकंवाचे रिंगण करत त्यात आपल्या पीडित महिलेला बसवून नग्न करून अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले.
यावेळी दीर व सासूने तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून तिला डांबून ठेवले. हा प्रकार तुझ्या पतीला सांगितला तर तुला मारुन टाकू अशी धमकीही यावेळी महिलेला देण्यात आली. महिलेच्या रडण्याने शेजारी राहणाऱ्यांनी तिथे येत तिची सुटका केली. त्यानंतर महिलेने ही घटना आई-वडिलांना कळवली. यानंतर माहेरी बारामतीत येत सासरच्या लोकांसह मांत्रिकाविरोधात तिने फिर्याद दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App