“उखाड दिया” म्हणून मारल्या फडतूस फुशारक्या “स्व” पक्षाच्याच उडाल्या चिंधड्याचिंधड्या!

Shelar and raut new

संजय राऊतांच्या पिचकाऱ्यांनीच मशाल मात्र एक दिवस विझणार! – आशिष शेलारांनी साधला निशाणा!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय”, असं म्हटल्याने, मागील काही दिवासांपासून राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे दिसत आहे. भाजपाने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. असे असताना आज ठाकरे गटाच मूखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून पुन्हा एकदा भाजपाला डिवचण्यात आलं. यावर आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  Ashish Shelar targeted Sanjay Raut for criticizing BJP in the editorial of Dainik Saamna

‘’सामना अग्रलेखातील पिचकारीने “लोडेड काडतूस” नाही भिजणार, संजय राऊतांच्या पिचकाऱ्यांनीच मशाल मात्र एक दिवस विझणार! “हाता”वरच्या “घड्याळा”चे टायमिंग काय परफेक्ट, कार्यक्रम झाला एकदम करेक्ट. “उखाड दिया” म्हणून मारल्या फडतूस फुशारक्या “स्व” पक्षाच्याच उडाल्या चिंधड्याचिंधड्या!’’ असं आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

सामना अग्रलेखात काय म्हटले आहे? –

“राज्य सरकार किंवा ते चालवणारे फडतूस आहेत असे फक्त लोकांनाच वाटत नाही, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयासही वाटते. महाराष्ट्राचे सरकार ‘नपुंसक’ आहे म्हणजेच बिनकामाचे आहे, असे जर सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, तर मग भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय? ‘नपुंसक’ किंवा ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ या ‘बावन’ आण्यांनी समजून घेतला पाहिजे. शब्दकोश म्हणतो, ‘बिनकामाचे, निरर्थक म्हणजे फडतूस,’ पण ‘फडतूस’ शब्द कमळाबाईच्या आरपार घुसला”, अशा शब्दांत ठाकरे गटाकडून टोला लगावण्यात आला आहे.


‘’आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस” आहेत!’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार


याशिवाय “राज्याचे काडतूस गृहमंत्री फडतूस भाषेत आरोळी ठोकतात, “मी काडतूस आहे, हम घुसेंगे”. साहेब, किधर घुसेंगे? एकदा काय ते स्पष्ट करा. तिकडे चीन अरुणाचलमध्ये एकदम आतमध्ये घुसला आहे. ११ गावांची नावे चीनने परस्पर बदलली. तरीही तुमचे भीमपराक्रमी पंतप्रधान चीनचे नाव घेऊन इशारा द्यायलाही तयार नाहीत. पाकिस्तानला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत, पण आत घुसलेल्या चीनचे काय? चीनचे जे काडतूस आत घुसले आहे ते आधी तुमच्या त्या ‘बावन’ आण्यांना काढायला सांगा”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

याचबरोबर ‘’या भिजलेल्या काडतुसांना संगीता डवरेंचे काय झाले याची माहिती होती काय? मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस पत्नी संगीता डवरे यांची अखेर मृत्यूशी झुंज मंगळवारी संपली. २७ मार्च रोजी मंत्रालयाच्या दारात एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील धुळ्याच्या शीतल गादेकर आणि नवी मुंबईच्या संगीता डवरे यांचा मृत्यू झाला. संगीता डवरे व शीतल गादेकर यांच्या आत्महत्येची माहिती आपल्या ‘काडतूस’ गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे काय?” असा सवाल ठाकरे गटानं विचारला आहे.

Ashish Shelar targeted Sanjay Raut for criticizing BJP in the editorial of Dainik Saamna

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात