
विशेष प्रतिनिधी
कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. किमान समान कार्यक्रमावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, एकत्र येऊनही हे लोक सुधारत नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडलो आहे. शरद पवार तर ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर न ठेवता त्यावर प्रक्रिया करणाºया लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.As Sharad Pawar is not improving, we out of the Mahavikas Aaghadi, said Raju Shetty
पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकºयांचे प्रश्न राजकारणापलीकडे जाऊन ऐरणीवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच प्रत्येक गावांमधील ग्रामसभेत शेतीला दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे. शेतमालाला हमीभाव केंद्राने मंजूर करावा, अशा आशयाचे दोन ठराव करून घेत आहोत.
निसगार्तील सहा घटकांपासून वीज तयार होते. मात्र, विजेचे वाटप करताना शेतकऱ्यांना आठ तास आणि इतरांना चोवीस तास हे गणित चुकीचे आहे. शेतकºयांशी सरकार क्रूरतेने वागत आहे. म्हणूनच याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.
एकरकमी एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. सुरू होणाºया गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. त्यासाठी टोकाचा संघर्ष करणार आहे.
राज्यात ६५ ते ७० लाख टन ऊस गळिताशिवाय शिल्लक आहे. तो अचानक उभा राहिलेला नाही. उसाचे नोंदलेले क्षेत्र, उपलब्ध असणारी गाळप क्षमता ही सरकारला माहीत होती. त्यांनी त्याबाबत नियोजन करणे गरजेचे होते. योग्य नियोजनाच्या अभावामुळेच हा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला.
As Sharad Pawar is not improving, we out of the Mahavikas Aaghadi, said Raju Shetty
महत्त्वाच्या बातम्या
- हनीट्रॅपर रेणू शर्मा हिला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागणी प्रकरण
- Navneet Rana : राणा दांपत्याचा जामीन घेण्यास नकार, पण नारायण राणे – फडणवीसांना “साद”!!
- शिवसेनेचे हिंदुत्व कसले गदाधारी?, उद्या त्यांच्या हातात झाडू येईल; नारायण राणेंचा टोला!!
- राणा दाम्पत्याची थेट मुख्यमंत्र्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार; कटकारस्थान चिथावणीचे आरोप!!
Array