शिवसेनेच्या शहराध्यक्षासह आठ शिवसेनेच्या नेत्यांना होणार अटक, किरीट सोमय्या यांचा हल्लाप्रकरणी दावा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पुण्याचे शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरेंसह ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. शनिवारी पुणे महापालिकेच्या समोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता.Arrest of eight Shiv Sena leaders including Shiv Sena city president, Kirit Somaiya’s claim in attack case

आपल्या या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील कोणती कलमं लावण्यात आली याचीही माहिती दिली. मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह ८ शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत.



ऋकफ एफआयआर क्रमांक ००१२ आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५. शिवसेना पुणे शहराध्यक्ष संजय मोर यांच्यासह चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रुपेश पवार, राजेंद्र शिंदे आणि सनि गवते अशी या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

किरीट सोमय्या शनिवारी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

Arrest of eight Shiv Sena leaders including Shiv Sena city president, Kirit Somaiya’s claim in attack case

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात