विशेष प्रतिनिधी
मुंबई : बार मालकांकडून १०० कोटींच्या हप्तेवसुली प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सध्या ED चौकशी चालू असताना आणि ते अटकेच्या दारात असताना देखील आहे. ते ज्ञानेश्वरी या सरकारी निवासस्थानातच कसे काय राहू शकतात, या प्रश्नाचा भडिमार नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून केला आहे. Anil deshmukh still occupies govt benglow dyaneshwari after his resignation as home minister in extortion case
ज्ञानेश्वरी हा सरकारी बंगला अनिल देशमुखांना ते कॅबिनेट मंत्री आहेत म्हणून ऍलॉट झाला होता. अँटिलिया स्फोटके प्रकरण, त्यानंतर उद्भववलेले सचिन वाझे १०० कोटी वसूली प्रकरण यामध्ये अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला.
अनिल देशमुख यांनी ५ एप्रिल रोजी राजीनामा दिला होता. ते काही सन्मानाने निवृत्त झालेले नाहीत तर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांची गच्छंती झालेली आहे. शिवाय ED ने त्यांच्या बंगल्याची झडतीही घेतली आहे. वसुली प्रकरणातले पुरावे अनिल देशमुखांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का, याचाही तपास ED करीत आहे.
अशा स्थितीत अनिल देशमुख त्यांचे सरकारी निवासस्थान इतके दिवस स्वतःकडे कसे काय ठेवू शकतात? याबाबतचे काही सरकारी नियम काय आहेत की नाहीत?, अशा सवालांचा भडिमार नेटकऱ्यांनी ठाकरे – पवार सरकारवर केला आहे.
अनिल देशमुख सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मुंबईतच वरळी इथे त्यांचे खासगी निवासस्थान असल्याचे बातम्यांमधून समजते. मग ते एवढे दिवस सरकारी निवासस्थान का आडवून ठेवत आहेत आणि मुख्यमंत्रीही त्यांना अशी मुभा का देत आहेत? सामान्य माणसाला गंभीर आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला तर त्यालाही अशी सवलत मिळते का? कायद्याच्या अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावरून फिरत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App