प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस बदल्या आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तपास यंत्रणेने पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने पोलीस बदल्यांच्या प्रकरणात देशमुखांचा सहभाग आहे, असे निरीक्षण नोंदवले आहे. परिणामी त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.Anil Deshmukh: Anil Deshmukh involved in police transfer malpractice ;Tashree of PMLA Court
गैरव्यवहारात सक्रिय असल्याचे पुरावे
पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष करून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख हे सामील असल्याचे समोर आले आहे. देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
यावेळी न्यायालयाला अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय असल्याचे उपलब्ध पुराव्यानुसार दिसून आले. तसेच त्यांनी स्वतः दबाव टाकत पोलीस बदल्यांमध्ये अवाजवी हस्तक्षेप केला, असे मत न्यायालयाने मांडले.
बनावट कंपनीद्वारे मिळणाऱ्या पैशाविषयी स्पष्टीकरण नाही
दिल्लीच्या एका पेपर कंपनीकडून देणगी म्हणून देशमुखांच्या मालकीच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या बँक खात्यात 10.42 कोटी जमा करण्यात आले. त्यातील 2.83 कोटी देशमुख यांच्या खात्यात ते गृहमंत्री असताना जमा झाले होते.
बनावट कंपनीद्वारे मिळणाऱ्या पैशाविषयी कोणतेही स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. देशमुख यांचे वय आणि त्यांनी कारागृहात घालवलेला कालावधी याचा देशमुख यांच्या जामीन अर्जविषयी काहीही संबंध नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App