अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानियाला उल्हासनगरातून अटक


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याचे अमिष दाखवून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानिया या युवतीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश महाराष्ट्र विधानसभेत केल्यानंतर पोलिसांनी अनिक्षा जयसिंघानिया हिला तिच्या उल्हासनगर मधील घरातून अटक केली. पोलीस तिला उद्या कोर्टात हजर करणार आहेत. Aniksha Jaisinghania, who blackmailed Amrita Fadnavis, was arrested from Ulhasnagar

इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली बातमी आणि त्यावर विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेला मुद्दा यावरून देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रकरणाचा विधानसभेत पर्दाफाश केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम विशद करताना अनेक धक्कादायक खुलासही केले होते.

हे प्रकरण असे :

देवेंद्र आणि अमृता फडणवीसांना लाचखोरीत ट्रॅप करण्याचे बड्यांचे षडयंत्र; फडणवीसांनी विधानसभेत नावे न घेता केले धक्कादायक खुलासे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी डिझायनर अनिक्षा जयसिंघानिया आणि तिचे वडील बुकी अनिल जयसिंघानिया यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यापैकी अनिल जयसिंघानिया आधीच फरार आहे, तर अनिक्षाला पोलिसांनी अटक केली आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर विरोधकांच्या हाती मोठे बटेर लागल्यासारखे झाले. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर ताबडतोब खुलासा केला आहे. इतकेच नाही, तर या खुलाशात अनेक धक्कादायक आणि सूचक बाबीही देवेंद्र फडणवीस यांनी सदनासमोर अधिकृत पटलावर आणल्या.

देवेंद्र फडणवीस यांना ते विरोधी पक्षनेते असण्याच्या काळात कोणत्या प्रकारे अडकवण्याचे प्रयत्न झाले, अतिवरिष्ठ पातळीवरून किती षडयंत्र रचली गेली होती, याचे खुलासे त्यांनी आधी केले होतेच. पण त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज तपशीलवार प्रकाश टाकला आणि आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना लाचखोरीपासून बाकीच्या प्रकरणांमध्ये कसा अडकवायचा प्रयत्न झाला, याचाही स्पष्ट खुलासा केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजितदादांनी हा विषय काढला हे फार बरे झाले या संदर्भात सदनात बोलायचेच होते. अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती असून, तो सात आठ वर्षे फरार आहे. त्याच्यावर १४ ते १५ गुन्हे दाखल आहेत. याची एक मुलगी २०१५-१६ दरम्यान पत्नीला भेटत होती. नंतर अचानक भेटणे बंद केले. २०२१ साली पुन्हा तिने पत्नीला भेटणे चालू केले. तेव्हा तिने सांगण्यास चालू केले. मी डिझायनर आहे, कपडे आणि दागिने तयार करते. विश्वास संपादन करण्यासाठी तिच्या आईचे एक पुस्तकही तिने प्रकाशन करून घेतले.

एके दिवशी तिने सांगितले, की माझ्या वडिलांना काही चुकीच्या गुन्हा अडकवण्यात आले आहे, त्यांना सोडवा. त्यावर पत्नीने काही असेल तर मला निवेदन देण्यास सुचवले. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी १ कोटी रुपयांची ऑफर दिली. मात्र, चुकीचे अडकले असतील, तर पोलिसांकडून सोडवता येईल, असे पत्नी म्हणाली. पण, तिने सातत्याने बुकींचा विषय काढल्यावर पत्नीने तिला फोनवर ब्लॉक केले, असे फडणवीस म्हणाले.

मात्र ब्लॉक केल्यावर दोन दिवसांनी अनोळखी नंबरवरून काही व्हिडीओ आणि क्लीप आल्या. यातील एक व्हिडीओ गंभीर होता. त्यात ही मुलगी बाहेर कुठेतरी बॅगेत पैसे भरत आहे. दुसऱ्या व्हिडीओत ती मुलगी आमच्या घरातील महिला कर्मचाऱ्याला बॅग देताना दिसत आहे. नंतर पत्नीला त्या व्यक्तीने धमकी दिली की, हे व्हिडीओ आम्ही व्हायरल करू. माझे सर्व पक्षाशी संबंध आहेत. त्यामुळे आम्हाला मदत करत तात्काळ केसेस परत घेण्याची कारवाई करा. ही गोष्ट पत्नीने सांगितल्यावर आम्ही तातडीने गुन्हा दाखल केला, असे फडणवीस म्हणाले.

परंतु, नंतर तिने पत्नीजवळ मान्य केला की, वडिलांवरील आणि माझ्यावरील गुन्हे परत घ्यायचे आहेत, म्हणून मी व्हिडिओ काढले. पण मला मदत करा. व्हिडीओ कुठेच व्हायरल करणार नाही. तिला वाटत होते, याची माहिती मला आणि पोलिसांना नाही. तेव्हा काही पोलिसांनी आणि बड्या नेत्यांची नावे तिने घेतली. मागील पोलीस आयुक्तांच्या काळात आमचे गुन्हे मागे घेण्याचा कारवाई सुरू झाली होती. पण, तुमचं सरकार आल्यावर ती थांबली. बोलताना तिने संकेत दिले, कसे हे तिला करायला सांगितलं, असा धक्कादायक खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला. या तिने कोणाची नावे घेतली असली तरी तिच्या माहितीच्या आधारावर आपण कोणावर आरोप करणार नाही. तिने अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली, ती धक्कादायक आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तिने काढलेले व्हिडिओ त्या संदर्भात फॉरेनसिक तपास केला आहे त्या व्हिडिओतल्या फ्रेम टू फ्रेम तपासण्या झाल्या आहेत. त्यातले तथ्यही उघड झाले आहे.

पण एफआयआर दाखल केल्यामुळे तो दोन दिवसात कोर्टात सादर करावा लागतो. त्यामुळे या संदर्भात तो एफआयआर इंडियन एक्सप्रेसला मिळाला आणि त्यांनी त्याची बातमी छापली. पण या केसच्या निमित्ताने पोलिसांना पाच-सहा वर्षांपासून फरार असलेला अनिल जयसिंघानिया याला पकडायचे होते. आता हाती आलेल्या उपलब्ध पुराव्यांवरून त्यासंदर्भात चौकशी तपास चालू आहे. अनिल जयसिंघानिया हा आरोपी पाच ते सहा वर्षे फरार आहे. मात्र, मला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला, हे मी वारंवार सांगत होतो. तसेच, माझ्या कुटुंबाबतही काही चालले आहे, याची मला शंका होती, असेही फडणवीसांनी या उत्तराच्या निमित्ताने स्पष्ट केले होते.

Aniksha Jaisinghania, who blackmailed Amrita Fadnavis, was arrested from Ulhasnagar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात