कोरोनाच्या काळात देवदूतासारखा मदतीला धावणाऱ्या अभिनेता सोनू सूदने स्वत: कोरोनातून वाचल्यानंतर पुन्हा एकदा मदतीची मोहीम सुरू केली आहे. ट्विटरवरून मदत मागणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाला नागपुरातून थेट हैदराबादला एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून एअरलिफ्ट करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. विशेष म्हणजे मागील शनिवारी सोनूला कोरोनाची बाधा झाली होती व नुकताच त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.And Sonu Sood took her by air ambulance from Nagpur to Hyderabad
विशेष प्रतिनिधी
नागपूर : कोरोनाच्या काळात देवदूतासारखा मदतीला धावणाऱ्या अभिनेता सोनू सूदने स्वत: कोरोनातून वाचल्यानंतर पुन्हा एकदा मदतीची मोहीम सुरू केली आहे.
ट्विटरवरून मदत मागणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाला नागपुरातून थेट हैदराबादला एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून एअरलिफ्ट करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. विशेष म्हणजे मागील शनिवारी सोनूला कोरोनाची बाधा झाली होती व नुकताच त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतर करणाऱ्या हजारो कामगारांना सोनू सूदने मदत केली होती. हाच वसा कायम ठेवत त्याने मदत केली. नागपुरातील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली.
तिच्या फुप्फुसांमध्ये ८५ ते ९० टक्के संसर्ग झाला. सोनू सूदला यासंदर्भात ट्विटरवर संपर्क साधला असता त्वरित त्याने सूत्रे हलविली. अगोदर तिला नागपुरातील एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले; परंतु तिची स्थिती पाहता तातडीने फुप्फुसाचे प्रत्यारोपण करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
त्यानंतर सोनू सूदने हैदराबाद येथील एका मोठ्या इस्पितळात तिला एअरलिफ्ट करण्याची व्यवस्था केली. त्या इस्पितळात ईसीएमओ म्हणजेच फुप्फुसांवरील ताण हटविण्यासाठी रक्त कृत्रिमपणे शरीरात टाकण्याची व्यवस्था आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App