दरम्यान अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनानं आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला.Amravati: Statue of Chhatrapati Shivaji Maharaj should be installed with permission – Shiv Sena leader Arvind Sawant
विशेष प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी विना परवानगी राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता.दरम्यान अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनानं आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला.
दरम्यान काल रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले व नंतर हा पुतळा काढण्यात आला.याप्रकरणी आमदार रवी राणा, नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली होती.दरम्यान अमरावतीच्या प्रकरणी राजकारण करण्यात येवू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेऊन बसवावा, असं शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटलंय.
त्यावर सावंत बोलत होते. शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. ते आदर्श राजे होते. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारणं म्हणजे प्रेम नाही, तर त्यांच्या आदर्शावर चालणं हे खरं प्रेम आहे, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App