अमरावती पालिकेकडून भाजपला देणगी नाही आपदा कोषाला भाजप नगरसेवकांकडून ४.८० लाख


अमरावती : अमरावती महापालिकेने भाजपला ४.८०लाख रुपये देणगी दिल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे महापौरांनी म्हंटले आहे.अमरावती पालिकेने भाजपला ४.८० लाखाची देणगी दिल्याचा दावा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस या संस्थेच्या अहवालात केला आहे. तो महापौर चेतन गावंडे यांनी फेटाळून लावला आहे.Amravati Municipality has Not Given Any Donation to BJP : Mayour Chetan Gawande cleared

पालिकेचा निधी नसून भाजप नगरसेवकांचे मानधन

२०१९ मध्ये कोल्हापूरला पुराचा तडाखा बसला होता. त्यावेळी अमरावती महापालिकेतील सर्व सदस्यांनी एक महिन्याचे मानधन मदत निधी म्हणून देण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०१९ च्या सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव ठेवला होता. त्याला सभागृहाने मंजुरी दिली होती.



दरम्यान, काँग्रेस, शिवसेना, बसपा, एआएमआयएम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री मदत कोषात दिले होते. परंतु, भाजपच्या ४८ नगरसेवकांनी मात्र, आपले एक महिन्याचे मानधन भारतीय जनता पक्ष आपदा कोषामध्ये स्वेच्छेने देण्याबाबत महापालिका प्रशासनला ठराव करून सांगितले होते. हा ‘महापालिकेचा निधी नाही, आमचे मानधन दिले.’ असे गावंडे यांनी स्पष्ट केले.

  •  कोल्हापूर पूरग्रस्तांना भाजप नगरसेवकांचे मानधन
  •  भाजपला २०१९ मध्ये कोणतीही देणगी दिली नाही
  • भाजप आपदा कोषमध्ये ४.८० लाख मानधन जमा
  • महापालिका प्रशासनला ठराव करून घेतला निर्णय
  • भाजप सोडून इतर पक्षांचे मानधन मुख्यमंत्री कोषात
  • पालिकेचा निधी नसून भाजप नगरसेवकांचे मानधन

Amravati Municipality has Not Given Any Donation to BJP : Mayour Chetan Gawande cleared

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात