वृत्तसंस्था
पुणे : : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी ( ता. १९) पुण्यात केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (CFSL) नवीन इमारतीचे उद्घाटन केले. Amit Shah inaugurates new building of Central Forensic Science Laboratory in Pune
अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शाह यांनी आज सकाळी ११ वाजता पुण्यातील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (सीएफएसएल) कॅम्पसला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या केंद्राला भेट दिली.
तेथे लष्कर आणि निमलष्करी दलासाठी तेथे सराव आणि प्रशिक्षण दिले जाते. तेथे त्यांनी जवानांसोबत दुपारी भोजन घेतले. त्यांच्या आगमनानिमित्त ‘बडा खाना’ आयोजित केला होता. आज सकाळी अमित शाह यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराला भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आपल्या पुणे दौऱ्याला प्रारंभ केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App