विशेष प्रतिनिधी
पुणे : लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर करणाऱ्या तरुणीने पुन्हा आरोप केले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधान परिषद उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे अत्याचाराची तक्रार करुनही कसली दाद दिली नाही, असे तिने सांगितले. Allegation of eviction of a young woman even after contacting Shiv Sena leaders
लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरुन टीका करत कुचिक यांना जामीन देण्यात आल्याने संताप व्यक्त केला होता. या तरुणीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचाही आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. पीडित तरुणीने फेसबुकवर आपण स्वत:ला संपवत असल्याची पोस्ट केली असून ती मुलगी बेपत्ता आहे असा दावाही चित्रा वाघ यांनी केला होता.
दरम्यान पीडित तरुणीनेशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. आपण संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली होती, पण कोणीही मदत केली नाही असा आरोप तरुणीने केला आहे. तसेच महिला आयोग आणि पोलिसांनी मदत न केल्यामुळेच आपण चित्रा वाघ यांच्याकडे गेलो असा दावा केला आहे.
एकदा अनेक प्रयत्न केल्यानंतर संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाठवले. गोऱ्हे यांनी संपर्क साधला. माझ्याकडून स्त्री आधार केंद्राचा फॉर्म भरुन घेतला. पण त्यानंतर त्यांनी परत कधीही मला फोनही केला नाही आणि विचारणाही केली नाही. संजय राऊतांनीही परत फोन केला नाही, असे या तरुणीचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App