प्रतिनिधी
अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काम करून दाखवण्यापेक्षा शब्दांचे खेळ करण्यात माहीर आहेत, असे शरसंधान शरद पवारांनी साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत साधले होते. त्याचवेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही चिमटे काढले होते.All the efforts of Pawar to keep the NCP united; Devendra Fadnavis’ gang
मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या शरसंधानवर प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंधार ठेवण्यासाठी पवारांना सगळ्या कसरती कराव्या लागत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. त्यांचे पार्सल महाराष्ट्रात परत पाठवून द्या. आम्ही बघतो काय करायचे ते, असा टोला फडणवीस यांनी बेळगाव मधल्या प्रचार सभेत हाणला होता.
या संदर्भात पवारांना साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर पवारांनी देवेंद्र फडणवीस काम करून दाखवण्यापेक्षा शब्दाचे खेळ करण्यात माहीर असा प्रतिटोला हाणला होता. त्यावर आता फडणवीस यांनी राष्ट्रवादीतल्या पवारांच्या राजीनामा नाट्यावर खोचक शब्दात टोला हाणला आहे. शरद पवार काहीही बोलू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध ठेवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागते आहे. त्यामुळे त्यांनी भाजप सारख्या पक्षावर बोलायचे का नाही ते ठरवावे, असा प्रतिटोला फडणवीस आम्ही हाणला आहे.
एरवी शरद पवार केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांसंदर्भात कोणतेही भाष्य करत असतात. प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना दुय्यम लेखून ते दुर्लक्षित करत असतात. पण विस्तारित आत्मचरित्राच्या प्रकाशनापासून पवारांनी महाराष्ट्र पातळीवरील उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देखील टीका टिप्पणी करायला सुरुवात केली आहे. यापैकी पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचे बी टीम म्हटले आहे, तर देवेंद्र फडणवीस यांनी आजच पवारांना राष्ट्रवादी एकसंध ठेवण्यासाठी पवारांची कसरत अशा शब्दांत टोला हाणून घेतला आहे. पण त्यामुळे पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्म पितामह होता होता आता अनेक नेत्यांपैकी एक नेते होऊन बसले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App