खासदार प्रकाश जावडेकर आणि शहराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
विशेष प्रतिनिधी
पुणे : आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी अनेक दिग्गजांचीं नाळ जोडलेली आहे.. या केंद्रावरून अनेक दिग्गज मंडळींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सकाळच्या सातच्या प्रादेशिक बातम्या ह्या आकाशवाणीची ओळख ठरल्या. आणि याच सातच्या बातम्यांनी अनेक दिग्गजांच्या आवाजालाही ओळख दिली. मात्र हा आवाजच आता बंद होणार अशी दोन दिवसांपासून चर्चा होती. प्रसार भारती कडून तशी नोटीस आल्यानंतर. सामाजिक जीवनात आणि राजकीय जीवनात सक्रिय असणाऱ्या सगळ्याच पुणेकरांनी आणि सामान्य श्रोत्यावर्गांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.All India Radio Aakashvani Pune .
आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणार सकाळी सात: दहाच प्रादेशिक बातमीपत्र आणि सकाळी साडेआठ वाजता प्रसारित होणार राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, छत्रपती संभाजी नगर वरून प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र आता या हा निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे.
खासदार प्रकाश जावडेकर आणि शहराचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांच्या जनभावना अनुराग सिंह ठाकुर यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्यांच्याशी चर्चा केली . आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अनुरासिंग ठाकूर यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, हा निर्णय मागे घेतल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अनुरागसिंह ठाकूर यांचे ट्विट करून आभार मानले आहेत.
जावडेकर सध्या तेलंगणा दौऱ्यावर असून, त्यांनी अनुराग सिंग ठाकूर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी चंद्रकांत पाटील यांनी देखील हा निर्णय रद्द व्हावा यासाठी अनुराग सिंग ठाकूर यांना पत्र लिहिलं होतं. आणि अनुरासिंग ठाकूर यांच्याशी चर्चा केली होती. त्या चर्चेला अनुरासिंग ठाकूर यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादाला आला होता. बाबतच्या आकाशवाणी पुणे केंद्रा बाबतच्या या निर्णयामुळे आकाशवाणीच्या श्रोत्यांमध्ये आणि कर्मचारी वर्गामध्ये सध्या विशेष आनंद आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App