कोरोनाच्या या संकटकाळामध्ये सर्वांनी एकजूट होऊन याचा सामना करणं गरजेचं आहे. हे संकट एवढं मोठं आहे की केवळ सरकार किंवा वैयक्तिकपणे याला सामोरं जावू शकत नाही. त्यामुळंच सरकारसह अनेक सामाजिक संस्था, बड्या हस्ती त्यांना शक्य होईल त्या पद्धतीनं या संकटाचा सामना करण्यासाठी मदत करत आहेत. या संकटावर मात करताना अनेक बाजुंनी काम होणं गरजेचं आहे. एकिकडं रुग्णांना आरोग्य सेवा मिळणं गरजेचं आहे. त्यावेळी ज्यांना या काळात अगदी खायचं काय? हा प्रश्न पडलाय त्यांना मदत करणंही गरजेचं आहे. अशा गरजुंसाठी बॉलिवूड स्टार अक्षय कुमारनं पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. त्यानंतर गौतम गंभीरच्या GGF फाऊंडेशनला तब्बल 1 कोटींची मदत केली आहे. या संस्थेमार्फत गरीबांसाठी या संकटकाळात जेवण पुरवण्याची व्यवस्था केली जात आहे. तसंच औषधी आणि ऑक्सिजन पुरवठाही केला जात आहे. Akshay Kumar donated one crore for food, medicine and oxygen in corona pandemic
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App