शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर नेते, कार्यकर्ते रडत असताना, अजित पवारांच्या भूमिकेवरून चर्चांना उधाण!

जाणून घ्या, शरद पवारांसमोरच अजित पवार नेमकं काय म्हणाले…

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केले. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते अगदी प्रदेशाध्यक्षांपर्यंत सर्वांसाठी धक्कादायक होता. कारण, शरद पवारांनी अशी कोणालाच कल्पनाही दिली नव्हती. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांना भावना  अनावर  झाल्या, अनेकांना रडू कोसळले. असे असताना  अजित पवारांची काहीशी वेगळी प्रतिक्रिया समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. Ajit Pawars role on Sharad Pawars retirement decision sparks discussion

अजित पवार म्हणाले, शरद पवार निर्णय घेत असताना लोकशाही पद्धतीने चर्चा करूनच निर्णय घेतात. मात्र  आज  पुस्तक प्रकाशनासाठी आपण सर्वजण  एकत्र  आलो असताना,  त्यांनी अचानक  निवृत्तीची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हटले होते की भाकरी फिरवायची हीच योग्य वेळ आहे. तेव्हा कार्यकर्त्यांना वाटलं होतं की बाहेर काही बदल होतील,परंतु आज  त्यांच्या वक्तव्याचा अर्थ उलगडला आहे.

तसेच, “राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला परिवार आहे. परिवारच राहणार आहे. आपण सगळ्यांनी साहेबांकडे पाहूनच काम केलं आहे. साहेबांच्या डोळ्यादेखत नवा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको?” असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला. मात्र त्यानंतरही  उपस्थित कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. शरद  पवारांनी तातडीने निर्णय मागे घ्यावा  अशी मागणी करत होते.

शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं? –

“प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शरद पवारांनी जाहीर केलं आहे.

Ajit Pawars role on Sharad Pawars retirement decision sparks discussion

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub