पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचारावरून प्रश्न विचारल्यावर याठिकाणी कोरोना रुग्ण वाढले तर आपली जबाबदारी असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. आता खरोखरच या दोन्ही तालुक्यांत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याची जबाबदारी अजित पवार यांनी घ्यावी अशी मागणी केली जात आहे.Ajit Pawar now take responsibility, In Pandharpur, Mangalvedha corona patients are flowing
विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : पंढरपूरमंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचारावरून प्रश्न विचारल्यावर याठिकाणी कोरोना रुग्ण वाढले तर आपली जबाबदारी असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.
आता खरोखरच या दोन्ही तालुक्यांत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याची जबाबदारी अजित पवार यांनी घ्यावी अशी मागणी केली जात आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात सर्वत्र निर्बंध लादले मात्र पोटनिवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा या तालुक्यांना वगळले.
याबाबत पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना विचारले असता, या दोन तालुक्यात कोरोना रुग्ण वाढले तर माझी जबाबदारी असे पवार म्हणाले होते.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यसाठी मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना मेलद्वारे पाठविले आहे. यामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन्ही तालुक्यातील करोना रुग्णांच्या वाढीचा उल्लेख केला आहे.
सोलापूर जिल्ह्यत सर्वाधिक करोना रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत.आज पर्यंत एकूण ११ हजार ३०० जणांना कोरोना झाला असून २६४ जणांचा यामुळे जीव गेला आहे.
दरम्यान पंढरपूरमंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच पार पडल्यामुळे लोकांचा एकमेकाशी मोठ्या प्रमाणात संपर्क आला आहे. याचा परिणाम म्हणजे केवळ मागील सात दिवसात एक हजारहून अधिक रुग्ण पंढरपूर शहर व तालुक्यात आढळून आले आहेत.
या दोन तालुक्यात लस कमी प्रमाणात येत असल्याने नागरिक आरोग्य केंद्रामधून माघारी जात आहेत. यासाठी पंढरपूर व मंगळवेढा येथे दोन लसीकरण केंद्र वाढवावेत व जास्तीतजास्त लस उपलब्ध करून द्यावी,
अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App