प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणा अथवा धर्मवीर म्हणा त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी करून अजितदादांना या वादावरून सुनावले तरी देखील अजितदादा त्यांच्या जुन्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी माफी मागायलाही नकार दिला आहे. Chhatrapati Sambhaji Maharaj Swaraj Rakshak Ki Dharmveer
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते ते धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य अजितदादांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी विधानसभेत केले होते. त्यावरून महाराष्ट्रात अजित दादाविरुद्ध प्रचंड संताप उसळला अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी अजितदादांचे पुतळे जाळले. या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी अजितदादांची पाठराखण केली. सामना मधूनही अजितदादांचीच पाठराखण करण्यात आली.
पण शरद पवारांनी मात्र छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर होते. ही ज्याची त्याची मते आहेत आणि ती मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यावर काही आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे सांगत संभाजी महाराज धर्मवीर असल्याचा वेगळ्या पद्धतीने निर्वाळा दिला होता. एक प्रकारे अजितदादांच्या विधानाला त्यांनी छेद दिला होता. मात्र यातली राजकीय सूचकता लक्षात घेऊन अजितदादा हे नरमाईची भूमिका घेतील असे वाटत असताना प्रत्यक्षात अजितदादांनी आपली जुनीच आक्रमक भूमिका कायम ठेवत छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते ते धर्मवीर नव्हते, या विधानाचा पुनरुचार केला आहे. आपण कोणत्याही महापुरुषाचा अपमान केला नसून त्यामुळे आपण माफी मागण्याचा प्रश्नच नाही उलट भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला त्यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी असे वक्तव्य अजितदादांनी केले आहे.
अजितदादांच्या वक्तव्यातून भाजप विरोधातल्या भाजप विरोधातला सूर उमटला असला तरी खुद्द शरद पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्य रक्षक त्याचबरोबर धर्मवीर असा केल्यानंतरही अजितदादांनी आपली आपले जुनेच वक्तव्य कायम ठेवल्याने पवार काका – पुतण्यांमधील मतभेदाचा मुद्दा जाहीर रित्या पुन्हा एकदा समोर आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App