अजिंक्य देव साकारणार बाजीप्रभू देशपांडे!

वृत्तसंस्था

मुंबई : ‘सर्जा’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता अजिंक्य देव आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. Ajinkya Dev is now in the role of Bajiprabhu Deshpande

‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणाऱ आहे. या मालिकेत स्वराज्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा उलगडणार आहे. यात अभिनेता अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. अजिंक्य देव म्हणाला, ‘‘माझ्या करिअरची सुरुवात ‘सर्जा’ चित्रपटातील ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे.बाजीप्रभू देशपांडे यांनी जिवाची बाजी लावून पावन खिंड लढवली होती. ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अशा या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवे आव्हान आहे, असे सांगताना देव म्हणाला, या भूमिकेसाठी माझा लूक नवा आहे. फिटनेसच्या बाबतीत मी जागरुकच असतो. व्यायाम आणि खाण्याकरचं नियंत्रण यामुळेच मी फीट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी ते गरजेचे आहे. या सगळ्याचा उपयोग मला बाजीप्रभू साकारताना होतो आहे. या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून 26 जुलैपासून रात्री 10 वाजता ही मालिका रसिकांच्या भेटीला येईल.

Ajinkya Dev is now in the role of Bajiprabhu Deshpande

महत्त्वाच्या बातम्या