चिपिनंतर आता अमरावती येथून विमानसेवा; पुढील वर्षापासून विमानाची उड्डाणे सुरु होणार


वृत्तसंस्था

मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उदघाटन ९ ऑक्टोबरला होणार आहे. आता चिपी प्रमाणे पश्चिम विदर्भातील अमरावती येथूनही लवकरच विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. डिसेंबर अखेर येथील विमानतळाचे काम मार्गी लागणार असल्याचे वृत्त आहे. Airlines service from Amravati also after Chipin; The aircraft will start flying from next year

अमरावती विमानतळ सुरु करण्यासाठीच्या कामाला वेग आला आहे. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने राज्यातील ग्रामीण भागांना हवाई वाहतुकीशी जोडून तेथील अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे.

कोकणाला विमानवाहतुकीच्या नकाशावर आणणारा सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होत आहे. ₹ त्यानंतर पश्चिाम विदर्भाचे महसुली मुख्यालय असलेल्या अमरावती विमानतळाचे काम पूर्ण करून तो पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रवासी वाहतुकीला सज्ज होणार आहे. त्याचे नियोजन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने केले आहे. त्यामुळे नागपूरनंतर अमरावती हे विमानतळाच्या नकाशावर येणार आहे.



चिपी विमानतळ सुरु झाल्याने तळकोकणातील निसर्गसौदर्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. केवळ २५०० रुपयात विमानप्रवास होत आहे. पुणे विमानतळ व कराड विमानतळावरील जागेचा वापर करून या दोन्ही ठिकाणी विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्र (फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर) सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी त्यापोटी प्रत्येकी ३६ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला मिळेल, असेही दीपक कपूर यांनी सांगितले.

Airlines service from Amravati also after Chipin; The aircraft will start flying from next year

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात