विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून मुंबईत 12 डिसेंबर रोजी रॅली काढण्याचा मुद्द्यावर एआयएमआयएमचे नेते ठाम असून पक्षाचे औरंगाबादचे खासदार इमतियाज जलील हे मुंबईकडे रवाना देखील झाले आहेत. परंतु अहमदनगरच्या हद्दीत त्यांचा त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद झाला असून काही विशिष्ट अटींवर पोलिसांनी काही गाड्यांना मुंबईकडे जाण्याची परवानगी दिली आहे. AIMIM rally over issue of Muslim reservation sparked controversy
औरंगाबादहुन इम्तियाज जलील शेकडो गाड्यांसह मुंबईकडे येत असताना अहमदनगर मध्ये पोलिसांनी त्यांना अडवले. मुंबईत 144 कलम लागू झाल्याची जाणीव करून दिली त्या वेळी पोलिसांची त्यांची बाचाबाची झाली. रॅली काढण्याची पोलिसांची परवानगी आधीच घेतली आहे. चांदिवली सभा होऊन राहिली निघेल, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
परंतु मुंबईत आता 144 कलम लागू आहे. त्यामुळे रॅलीस परवानगी देता येणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांचा आदेश अंतिम आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे एआयएमआयएम आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष आता असून मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या मालकीचा मुद्द्यावरून रॅली काढण्यावर पक्षाचे नेते ठाम आहेत. या रॅलीला पक्षाचे हैदराबादचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी संबोधित करणार आहे मुंबईतला ओमायक्रोनचा धोका लक्षात घेता 144 कलम लागू करण्यात आले आहे, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.
तसेच येत्या 28 डिसेंबर रोजी काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांची रॅली मुंबईत आयोजित केली आहे. परंतु तिला देखील परवानगी द्यायची का नाही याचा विचार करावा लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यावरुन देखील राजकीय वाद होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App