पोलिसांनी कपड्यात गुंडाळलेले हे अर्भक ताब्यात घेतले.नंतर त्या अर्भकाला प्रवरा रुग्णालयात नेण्यात आले.Ahmednagar: Infants wrapped in clothes found in plowed farmland; Suspicion of female feticide
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर नांगरलेल्या शेतात मृत अर्भक आढळून आले असल्याची घटना घडली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी लोणी खुर्द येथील दिघे वस्तीवर भाऊसाहेब दिघे यांच्या नांगरलेल्या शेतजमिनीत कपड्यामध्ये गुंडाळलेले अर्भक असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली.त्यानंतर लोणी पोलिसांना कळवण्यात आले.पोलिसांनी कपड्यात गुंडाळलेले हे अर्भक ताब्यात घेतले.नंतर त्या अर्भकाला प्रवरा रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ते अर्भक कुजलेले असल्याने स्त्री की पुरुष याची स्पष्टता केली नाही.तसेच अर्भक पूर्ण दिवसाचे आहे व प्रसुतीनंतर लगेच ते टाकून दिले असावे.अस डॉक्टरांनी सांगितलं. तसेच हे अर्भक आठ ते दहा दिवसापूर्वी टाकलेले असावे आणि ही स्त्री भ्रूणहत्या असावी अशीही शंका घेतली जात आहे. यावर आता लोणीचे पोलीस कसून तपास करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App