अहमदनगर-बीड-परळी रेल्वेची ६१ किमी स्पीड ट्रायलला सुरुवात, प्रीतम मुंडेंची उपस्थिती, पंकजांनी मोदी- फडणवीसांचे मानले आभार!

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील सोलापूर वाडी ते आष्टी यादरम्यान रेल्वेची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दोन वर्षापासून हे काम अखंडपणे सुरू होते. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील ६१ किमी पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर हायस्पीड ट्रायल घेतली जात आहे. यासाठी दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी आले आहेत. Ahmednagar-Beed-Parli railway 61 km speed trial begins, Pritam Mundes presence, Pankaj thanked Modi Fadnavis


विशेष प्रतिनिधी

बीड : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील सोलापूर वाडी ते आष्टी यादरम्यान रेल्वेची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दोन वर्षापासून हे काम अखंडपणे सुरू होते. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील ६१ किमी पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर हायस्पीड ट्रायल घेतली जात आहे. यासाठी दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी आले आहेत.

बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते. या परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून या रेल्वे मार्गावर कामाने वेग घेतला. यामुळे आष्टीपर्यंतची रेल्वेचे कामे पूर्ण झाली आहे. एकूण 61 किलोमीटर अंतराचा असलेला हा टप्पा पूर्ण केला. या मार्गावर सोलापूरवाडी हे स्टेशन तयार करण्यात आले आहे. येथून दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी मनोज अरोरा यांच्या हस्ते या स्टेशनवर पूजा करण्यात आली. त्यानंतर या संपूर्ण 61 किमी अंतराच्या तपासणीस सुरुवात झाली. यासाठीची मोठी रेल्वे या रुळावर धावली. अधिकारी संपूर्ण रुळाची, पुलांची आणि सर्वांची पाहणी केल्यानंतर आष्टी येथून या हाय स्पीड ट्रायलला सुरुवात होणार आहे. त्यासाठी खासदार प्रीतम मुंडे उपस्थित आहेत.

याप्रसंगी खासदार प्रीतम मुंडे यांनीही माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, आज माझ्या एकटीच्या दृष्टीने नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. मुंडे साहेबांचे हे स्वप्न होतं, अनेकांनी यासाठी प्रयत्न केलं. अनेकांनी या लढ्यात योगदान दिलं आहे. मुंडे साहेबांच्या रूपात पहिल्यांदा या रेल्वेला भरघोस असा निधी मिळाला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने या रेल्वेला खऱ्या अर्थाने या रेल्वेला गती दिली. राज्यात भाजप सरकार असताना पंकजाताई पालकमंत्री होत्या. त्यावेळी आम्हाला राज्याला पन्नास टक्के हिस्सा वेळेत मिळत राहिला. त्यामुळेच आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हावासीयांचे अभिनंदन करते.”

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, उद्या एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये !!! माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली डॉ. प्रीतम मुंडे अजून एक रेकॉर्ड तुमच्या नावावर… धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी, सुधीर मुनगंटीवारजी आणि नरेंद्र मोदीजी. आमच्या शब्दाला पूर्ण करण्यात योगदान दिले.. धन्यवाद!!”

Ahmednagar-Beed-Parli railway 61 km speed trial begins, Pritam Mundes presence, Pankaj thanked Modi Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात