विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : सुख आणि समृद्धी आणणारे कायदे खूप दुःखाने मागे घ्यावे लागले. पर्याय नाही म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे कायदे मागे घ्यावे लागले.सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कायदे मान्य होते, मात्र काही गटाला हे कायदे मान्य नव्हते.Agriculture laws that bring happiness and prosperity were withdrawn with great sadness: Chandrakat Patil
त्यामुळे अतिशय दुःखाने हे कायदे मागे घेतले, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला व्यक्तिशः खूप दुःख झाले आहे. कॉन्ट्रॅक्ट शेती हे आधीपासूनच महाराष्ट्रात सुरू आहे. पण या देशात चांगले जरी असले तरी त्याला विरोध होत असतो.
मोदींना विरोध म्हणून चांगल्या गोष्टींना विरोध केला जातो आहे. शेतकऱ्यांना समजावून पुन्हा हे कायदे आणले पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकरी समाधानी होते, त्यांना कायदे पटले होते. केवळ काही विशिष्ट वर्ग याला विरोध करतात, असे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App