प्रतिनिधी
मुंबई : शेकडो कोटींच्या साखर कारखाना घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे घातल्यानंतर हसन मुश्रीफ मुस्लिम कार्ड खेळले आहेत. काही विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांवर कारवाई केल्याची भावना त्यांनी एका व्हिडिओतून व्यक्त केली आहे. After ED, income tax raids Hasan Mushrif plays muslim card
हसन मुश्रीफ यांच्या विविध ठिकाणांवर छापे पडल्याची बातमी समजल्यानंतर त्यांनी कागल बाहेरून एक व्हिडिओ जारी केला आहे. यात त्यांनी आपले 35 – 40 वर्षांचे सार्वजनिक जीवन जनतेसमोर असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक जीवनात आपण सर्व व्यवहार पारदर्शक ठेवला होता. परंतु आता सरकार बदलल्यानंतर नवाब मलिक यांना अटक झाली. सध्या माझ्यावर कारवाई सुरू आहे. मी आणि त्यानंतर अस्लम शेख यांच्यावर कारवाई होण्याची भाषा भारतीय जनता पार्टीचे नेते करत आहेत. याचा अर्थ काही विशिष्ट जाती-धर्माच्याच लोकांवर ते कारवाई करणार आहेत का?, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
Hassan Mushrif : 158 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हसन मुश्रीफ यांच्यावर मुलगा जावयासह पुणे जिल्हा न्यायालयाची कारवाई सुरू!!
आपल्यावर कारवाई करण्यासाठी कागल मधले भारतीय जनता पार्टीचे नेते दिल्लीत खेटे घालत होते. आपल्यावर येत्या चार-पाच दिवसात कारवाई होणार, असे म्हणत होते आणि त्यानंतर आज ईडी आणि इन्कम टॅक्सचे हे छापे पडले आहेत. इन्कम टॅक्सने दोन वर्षांपूर्वी असे छापे घातले होते. परंतु त्यावेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला काहीही सापडले नव्हते. त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते, असा दावा हसन मुश्रीफ यांनी या व्हिडिओत केला आहे.
मुश्रीफ यांच्या घरांवर छापे पडल्यानंतर कागल मध्ये मुश्रीफ समर्थकांनी बंद पुकारला होता. परंतु असा बंद पुकारू नये. कार्यकर्त्यांनी शांत राहावे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी व्हिडिओतून केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App