ठाकरे की शिंदे वादात एडव्हांटेज शिंदे; धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना खरी कोणाची ठाकरेंची का शिंदे यांची??, या वादातील पहिल्या फेरीचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगात लागला असून निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. अर्थात त्यामुळे या संघर्षाचा पुढचा टप्पा आता सुप्रीम कोर्टात सुरू होणार आहे. Advantage shinde : election commission gives bow and arrow symbol to eknath shinde faction of Shivsena

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक महत्वाचा वाद म्हणजे शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे होणार शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे होणार? हा विषय चर्चेत होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने याविषयावर दोन्ही गटाची सुनावणी घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय राखून ठेवला होता. अखेर शुक्रवार, १७ फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाची झाली, असा शिक्कामोर्तब एकप्रकारे झाला आहे.



निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णय असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले असून हा बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय असल्याचे म्हटले आहे. सगळे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आणि शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहिल्याने हा विजय झाला, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

आमचा शिंदे गट नाही, तर खरी शिवसेना : नरेश म्हस्के

आमचा शिंदे गट म्हणून उल्लेख करू नका, कारण धनुष्यबाण आम्हाला मिळाले आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध झाले आहे, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली.

Advantage shinde : election commission gives bow and arrow symbol to eknath shinde faction of Shivsena

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात