आम्ही देश सोडून पळालेलो नाही : सायरस पुनावाला


  • आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी या अफवा मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱ्या आहेत.

विशेष प्रतिनिधी

लंडन : मी आणि माझा मुलगा अदर पुनावाला देश सोडून पळालेलो नाहीत. आम्ही केवळ सुट्टीसाठी लंडनमध्ये आलो आहोत, असे वक्तव्य सायरस पुनावाला यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून अदर पुनावाला यांचे कुटुंब देश सोडून पळाल्याची चर्चा आहे. मात्र, आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी या अफवा मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱ्या असल्याचे सायरस पुनावाला यांनी म्हटले.Adar poonawalas father Cyrus joins family in London

प्रत्येक उन्हाळ्यात आमचे कुटुंब काही दिवसांसाठी सुट्टीवर लंडनला येतो. त्यामुळे आम्ही देश सोडून कुठेही पळालेलो नाही, असे सायरस पुनवाला यांनी स्पष्ट केले. कोविशिल्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमुळे पुनावाला कुटुंबीय गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहेत.

सध्याच्या घडीला देशात कोरोना लसींचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे अदर पुनावाला यांचे प्रत्येक वक्तव्य आणि कृतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. अशातच काही दिवसांपूर्वी अदर पुनावाला लंडनमध्ये गेल्याने उलटसुलच चर्चा सुरु आहेत.

आतापर्यंत भारतात देण्यात आलेल्या एकूण लसींपैकी 90 टक्के लसी या सिरम इन्स्टिट्यूटकडून पुरवण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत. आपल्याला भारतातील काही राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींकडून कोरोना लसीसाठी धमक्या मिळाल्याचे त्यांनी लंडनमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

Adar poonawalas father Cyrus joins family in London

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात