अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या कारला अपघात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. स्वतः त्यांनी अपघाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटो शेअर करताना किशोरी शहाणे यांनी लिहिले आहे की, आमच्या गाडीला अपघात झाला. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. देवाच्या कृपेने आम्हाला कुणालाही इजा झालेली नाही. Actress Kishori Shahane’s car crashes

हा फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळालेली नाही. अपघातामध्ये किशोरी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही इजा झालेली नाही. ते सर्व सुखरूप आहेत.मावळ तालुक्यातील पवना लेक परिसरात गिरावण येथे शनिवारी रात्री अपघात झाला. मुंबईकडे येत असताना किशोरी यांच्या गाडीला हा अपघात झाला. किशोर शहाणे आणि त्यांचे कुटुंबीय गाडीत होते. ते सर्व सुखरुप आहेत.

Actress Kishori Shahane’s car crashes

महत्त्वाच्या बातम्या