माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहार कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे.Accused of throwing stones at the house of former Congress MLA Virendra Jagtap and attacking Bachchu Kadu
विशेष प्रतिनिधी
अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालानंतर काँग्रेस विरुद्ध बच्चू कडू संघर्ष पेटला आहे.माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहार कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्यामागे राज्यमंत्री बच्चू कडू यांचा हात असल्याचा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर गुरुवारी सकाळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत हल्ला केला आणि त्यांच्या घरासमोर पुतळा जाळला.त्यानंतर या प्रकाराची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली. यावेळी आमदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पोलिस ठाण्यात जमा झाला.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या जल्लोषात काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप करत प्रहार कार्यकर्त्यांनी बँकेचे संचालक आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला केला.
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घरावर हल्ला करून घर पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आमदार विरेंद्र जगताप यांनी केला आहे. बच्चू कडू यांनीच कार्यकर्त्यांना हल्ला करायला लावला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरही हल्ला केला. पराभव झाला म्हणून कडू त्याचा राग अशा पद्धतीने काढत आहेत. राज्यमंत्री असलेल्या व्यक्तीला असे कृत्य न शोभणारे आहे. पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस योग्य ती कारवाई करतील, असे आमदार जगताप यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App