AAP Mumbai : ठाकरे बंधूंच्या घमासानाला तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीची जबाबदारी प्रीती शर्मा – मेननवर!!


प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे बंधूंच्या राजकीय घमासानाला मुंबईत तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीने (आप) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांची पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता यांनी परिपत्रक जारी करून घोषणा केली. आम आदमी पार्टी सर्व म्हणजे २३६ जागांवर उमेदवार उभे करून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी महानगरपालिका निवडणुका लढवणार आहे. Aam Aadmi Party’s responsibility to face Thackeray brothers’ harassment is Preeti Sharma

मुंबईच्या आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठीराष्ट्रीय सहसचिव अंकुश नारंग यांची नुकतीच प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांची पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. स्वागतार्ह पाऊल आहे. त्या मुंबईतील आमच्या सर्वात मोठ्या नेत्या आहेत आणि त्या नेहमीच सत्याच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. आम आदमी पार्टी सर्व म्हणजे २३६ जागांवर उमेदवार उभे करून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी महानगरपालिका निवडणुका लढवणार असल्याचे आम आदमी पार्टी मुंबईचे कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास यांनी सांगितले.


AAP Maharashtra : आम आदमी पार्टी महाराष्ट्रात भाजप विरुद्ध आक्रमक; पण मते मात्र “खाणार” महाविकास आघाडीची!!


पक्षाने मला दिलेली कोणतीही जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारते आणि मला सेवेची संधी दिल्याबद्दल अरविंद केजरीवाल जींचे आभार मानते. मुंबई ही माझी “जन्मभूमी” आणि “कर्मभूमी” आहे, असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.

सिंचन घोटाळा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका

प्रीती शर्मा मेनन या यशस्वी उद्योजक आहेत. ज्यांनी महिलांसाठी चालवली जाणारी पहिली महिला कॅब सेवा सुरू केली. इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीच्या संस्थापक सदस्यांपैकी त्या एक आहेत. सिंचन घोटाळा बाहेर काढल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

Aam Aadmi Party’s responsibility to face Thackeray brothers’ harassment is Preeti Sharma

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”