पुण्यात साजरी झाली आगळीवेगळी भाऊबीज ; २००० महिलांना गृहपयोगी वस्तूंची भेट , काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांचा अनोखा कार्यक्रम


साडी,धान्याचे किट व दिवाळी फराळ इत्यादी साहित्य या महिलांना भाऊबीजची भेट म्हणून दिले.या प्रसंगी सर्व भगिनींवर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.A very different brotherhood was celebrated in Pune; Gift of household items to 2000 women, a unique program by Congress group leader Aba Bagul


विशेष प्रतिनिधी

पुणे : यंदा दिवाळी भाऊबीजेनिमित्त आज विधवा व निराधार २००० महिलांना एकत्र करून आगळी वेगळी भाऊबीज साजरी करण्यात आली.पुणे महानगर पालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला.

साडी,धान्याचे किट व दिवाळी फराळ इत्यादी साहित्य या महिलांना भाऊबीजची भेट म्हणून दिले.शेकडो महिलांनी आबा बागुल व कार्यकर्त्यांना ओवाळले तसेच सारा परिसर रांगोळ्यानी सजवला होता.या प्रसंगी सर्व भगिनींवर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.



यावेळी बागुल म्हणाले की , दिवाळीमध्ये अशी भाऊबीज मिळाल्यामुळे आमची जगण्याची उमेद वाढली असे अनेक भगिनींनी बोलून दाखवले याप्रसंगी नंदकुमार बानगुडे. यांनी स्वागत केले व रमेश भंडारी यांनी आभार मानले.

कोरोना अथवा अन्य परिस्थितीत विधवा झालेल्या अथवा निराधार बनलेल्या भगिनींना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांचे जीवन पूर्ववत व्हावे त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण आरोग्य सदैव चांगल्या रीतीने चालू राहावे यासाठी त्यांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही असे भावनिक आवाहन याप्रसंगी आबा बागुल यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत,मंगलभाई भाटी, भगवान कडू, मधुकर कदम, अप्पा खवळे, ताई कसबे, नंदा ढावरे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल, सागर आरोळे ,इम्त्याज तांबोळी, समीर शिंदे, महेश ढवळे, लक्ष्मण कूतवळ , सुरेश गायकवाड,संतोष पवार, बाबलाल पोळके, संतोष पवार, सौरभ ढेबे, भरत तेलंग, सुरज सोनवणे, राजू देवेंद्र, यांनी अथक परिश्रम घेतले.

A very different brotherhood was celebrated in Pune; Gift of household items to 2000 women, a unique program by Congress group leader Aba Bagul

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात