पंकज घाेडेच्या बँक खात्यावर परदेशातून माेठया प्रमाणात रक्कम जमा


बीटकाॅईन गुन्हयातील अाराेपी असलेला सायबर तज्ञ पंकज घाेडे याच्या स्टेट बँकेच्या खात्यात सन २०१८ व २०१९ मध्ये अनेक परकीय देशातून विविध परकीय चलनाच्या स्वरुपात माेठया प्रमाणात रक्कमा प्राप्त झाल्याचे पाेलीसांच्या तपासात दिसून आले आहे.A large amount of money was deposited in Pankaj Ghade’s bank account from abroad


विशेष प्रतिनिधी

पुणे -बीटकाॅईन गुन्हयातील आराेपी असलेला सायबर तज्ञ पंकज घाेडे याच्या स्टेट बँकेच्या खात्यात सन २०१८ व २०१९ मध्ये अनेक परकीय देशातून विविध परकीय चलनाच्या स्वरुपात माेठया प्रमाणात रक्कमा प्राप्त झाल्याचे पाेलीसांच्या तपासात दिसून आले आहे. या परकीय चलनाबाबत प्राप्त रक्कमा संर्दभात पाेलीसांनी सखाेल तपास सुरु केला आहे.

बीटकाॅईन गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले आराेपी पंकज घाेडे व माजी आयपीसी अधिकारी रविंद्र पाटील यांनी जामीनाकरिता अर्ज न्यायालयात केला आहे. सदर जामीनास विराेध करताना सरकारी वकील विजयसिंह जाधव म्हणाले, पंकज घाेडे याच्या नावाने सन २०१८ नंतर अनेक देशी व विदेशी कंपन्यां सुरु झाल्याचे दिसून येत आहे.



आराेपीने सदर गुन्हयातील अपहारातून प्राप्त केलेल्या क्रिप्टाेकरन्सी द्वारे सदर कंपन्या सुरु केल्याची दाट शक्यता असून त्याबाबत सखाेल तपास करण्यात येत आहे. आराेपीला जामीन मिळाल्यास ताे सदर बाबतचे पुरावे नष्ट करु शकताे. आराेपीने मागील अनेक वर्ष पाेलीसांना तांत्रिक मदत करण्याचे काम केले असून त्याला कायद्याचे ज्ञान आहे. आराेपीने शांत डाेक्याने व जे त्याच्या तांत्रीक काैशल्याचा वापर करुन सदर गुन्हा केला आहे. गुन्हयातील मुळ आराेपींच्या क्रिप्टाेकरन्सी खात्यातील रिकव्हरीचा अहवाल जाणीवपूर्वक खाेटा देण्यात आला आहे.

संबंधित वाॅलेट मधुन रिकव्हरी नंतर ही शेकडाे बीटकाॅईन इतर क्रिप्टाेकरन्सी वाॅलेट मध्ये वळविल्याचे निष्पन्न झाले आहे. आराेपीच्या ताब्यातून जप्त केलेल्या इलेक्ट्राॅनिक डिव्हाइसचे विश्लेषण केले असता सदर आराेपीने इतरांचे नावाने खाते उघडुन क्रिप्टाेकरन्सीचे ट्रान्झॅकशन करत असल्याचे दिसून आले आहे.  गुन्हयाचे तपासात आराेपीने काेणतेही सहकार्य केलेले नसून त्याने केलेल्या क्रिप्टाे करन्सी ट्रान्झॅक्शनबाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली आहे. याबाबत पुढील तपास सायबर पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहे.

A large amount of money was deposited in Pankaj Ghade’s bank account from abroad

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात