खंडणी वसुलीच्या केसमध्ये ठाणे कोर्टाचे परमवीर सिंग यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

वृत्तसंस्था

ठाणे : मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये खंडणीखोरीच्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यातील एका केसमध्ये ठाणे कोर्टाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.A court in Thane has issued non-bailable warrant against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh in the

परमवीर सिंग सध्या गायब आहेत. आतापर्यंत अनेक केसेस मध्ये त्यांना समन्स बजावल्यानंतर देखील ते कुठल्याही कोर्टात हजर राहिलेले नाहीत. सचिन वाझे – अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात परमवीर सिंग यांचा देखील समावेश आहे.अनिल देशमुख हे पण सध्या गायब आहेत. परमवीर सिंग यांचाही ठावठिकाणा नाही. त्यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात खंडणीखोरीच्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकीच एका केसमध्ये ठाणे कोर्टाने परमवीर सिंग यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे आहे.आता या वॉरन्टला परमवीर सिंग कशा पद्धतीने प्रतिसाद देतात ते कोर्टात हजर होतात का?, की पोलीस त्यांचा शोध करून त्यांना अटक करून कोर्टात हजर करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अनिल देशमुख यांनादेखील आत्तापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले असून ते देखील एका ही समस्या वेळी हजर राहिलेले नाहीत. आता त्यांच्या विरोधात देखील कोर्टामध्ये नेमकी काय कारवाई होते याविषयी देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

A court in Thane has issued non-bailable warrant against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh in the

महत्त्वाच्या बातम्या