प्रतिनिधी
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिक 70 % लोक अनुकूल आहेत. परंतु आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊनच तो प्रकल्प पुढे नेऊ, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मात्र तरी देखील या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन उभे करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांनी समान भूमिका मांडत एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.70% of people in Barsu in favor of refinery project, CM’s statement; But Thackeray – Shetty together for opposition movement!!
बारसू प्रकल्पासंदर्भात आज दिवसभर मराठी प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या चालल्या. तेथे आंदोलक विरुद्ध पोलीस असा संघर्ष झाल्याच्या बातम्या आल्या. तेथे काही लोकांनी गवताच्या गंजी पेटवल्या. त्या विझवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी लाठीमार करून अश्रुधूर वापरल्याच्या बातम्या आल्या.
या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांनी आपले आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित केले.
पण दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली, तर तिकडे कोल्हापूर मध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी चलो बारसू या आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रात आता बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक बारसूवासी रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. या प्रकल्पाचा स्थानिकांना कसा लाभ होईल, त्यांचा रोजगार वाढवून तिथली अर्थव्यवस्था कशी सक्षम होईल, हे सरकार त्यांना समजावून सांगेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना प्रकल्पासाठी अनुकूल आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर प्रकल्प विरोधात अशी दुटप्पी भूमिका घेतल्याचे शरसंधानही साधले आहे. त्याच वेळी प्रकल्पा विरोधात उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी हे एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App