समर्थ रामदासांच्या स्वामींचे जन्म गाव जांबेतील राम मंदिरातून 450 वर्षांपूर्वीच्या श्रीराम मूर्तींची चोरी; महाराष्ट्रभर जनक्षोभ!!


प्रतिनिधी

जालना : समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी जांब समर्थ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. माहितीनुसार, मंदिरातून 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मुर्त्या चोरी करण्यात आल्या आहेत. समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्तीदेखील चोरली गेली आहे. तसेच, ऐतिहासिक पंचायतनदेखील चोरीला गेले आहे. 450 years old Shri Ram idols stolen from Ram temple

चोरीच्या या घटनेमुळे महाराष्ट्रभर जनक्षोभ उसळत आहे. चोरीचा छडा लवकरात लवकर लावून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सर्व मूर्ती परत मिळवाव्यात आणि सन्मानाने त्यांची प्राणप्रतिष्ठा पुन्हा करावी, अशी मागणी श्रीराम भक्तांनी केली आहे

रामदास स्वामी झोळीत ठेवत असलेली तसेच दंडात बांधत असलेल्या मारोतीच्या मुर्त्यादेखील चोरीला गेल्या आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रात्री 3 च्या सुमारास चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पाळत ठेऊन मंदिरातील चावी घेऊन चोरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विधासभेत पडसाद, राजेश टोपेंनी उपस्थित केला मुद्दा

विधानसभेत आमदार राजेश टोपे यांनी या चोरीचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, पहाटे 3.00 वाजता चोरट्यांनी जांब समर्थ येथील मंदिरातील मुर्त्या चोरल्या आहेत. या घटनेमुळे जनमाणसात रोष आहे. समर्थ रामदासांच्या जन्मागावी जांब समर्थ येथील राम मंदिरात महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात. राज्य सरकारने या स्थळाला ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी विधानसभेत केली आहे.

450 years old Shri Ram idols stolen from Ram temple

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात