राज्यातील 44 रेल्वेस्थानकांचा विमानतळासारखा कायापालट, मोदींच्या हस्ते उद्या देशातील 508 स्थानकांची पायाभरणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशभरातील 1300 व महाराष्ट्रातील 44 रेल्वेस्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यापैकी 508 रेल्वेस्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यावर 24 हजार 47 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 25 राज्यांत 508 स्थानके या माध्यमातून विकसित होतील.44 railway stations in the state will be transformed into airports, Modi will lay the foundation of 508 stations in the country tomorrow

रेल्वे अधिकारी म्हणाले, आगामी 50 वर्षांची गरज लक्षात घेऊन या स्थानकांचा विकास केला जात आहे. त्यासाठी टेंडर काढण्यात आली आहेत. विकास कार्य अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केले जात आहे. 1300 स्थानकांपैकी काही साेडल्यास सामान्यपणे स्थानक रेल्वे रुळाच्या केवळ एका बाजूने असल्याचे दिसून आले आहे. काही वर्षांत रेल्वे मात्र रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूने शहर विकसित झाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने लोक स्थानकावर येतात. त्यामुळेच दोन्ही बाजूने स्थानक इमारतीला विकसित केले जाईल. अनेक शहरांत तर रेल्वेस्थानकाजवळच बसस्थानक, ऑटो स्टेशन व मेट्रोही आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकाजवळच वाहतुकीच्या इतर पर्यायांची एकीकृत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बसस्थानक किंवा ऑटो टॅक्सी स्टँडशी रेल्वेस्थानकांना जोडले जाण्याचे नियोजन केले आहे.



जमीन कमी असलेल्या ठिकाणी रेल्वेस्थानकाची इमारत बहुमजली राहणार आहे. वरच्या मजल्यांवर प्लाझा विकसित केला जाईल. प्रतीक्षा कक्ष, रिटायरिंग रूम, भोजन कक्ष, दुकाने इत्यादी व्यवस्था असेल. स्थानकाच्या दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असेल. विमानतळ असलेल्या शहरांत चेक इन सुविधा असेल.

महाराष्ट्रातील या स्थानकांचे रुपडे पालटणार

अहमदनगर, कोपरगाव, बडनेरा, धामणगाव, परळी वैजनाथ, मलकापूर, शेगाव, बल्लारशहा, चांदा फोर्ट, चंद्रपूर, वडसा, गोंदिया, हिंगणघाट, पूलगाव, सेवाग्राम, वाशिम, चाळीसगाव, हिंगोली, जालना, परतूर, कोल्हापूर, लातूर, मुंबई परेल, कांजूर मार्ग, विक्रोळी, काटोल (नागपूर), गोधनी, नरखेड, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), किनवट, मुखेड, मनमाड, नगरसोल, उस्मानाबाद (धाराशिव), गंगाखेड, परभणी, पूर्णा, सेलू, आकुर्डी, दौंड, तळेगाव, कुर्डूवाडी, पंढरपूर, सोलापूर.

44 railway stations in the state will be transformed into airports, Modi will lay the foundation of 508 stations in the country tomorrow

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात