विशेष प्रतिनिधी
मुंबई – एकीकडे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना भायखळा कारागृहात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये कारागृहातील ४३ महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये चार लहान मुलांसह काही गर्भवतींचाही समावेश आहे.43 women prisners affected due to corona
काही दिवसांपूर्वी भायखळा कारागृहात एक महिला कैदी कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर पालिकेद्वारे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या दरम्यान सहा महिला कैद्यांना ताप आला होता.
या महिलांच्या तपासणीदरम्यान आणखी तीन महिला कैद्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. यानंतर १८ सप्टेंबरला ९७ कैद्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४३ महिला कैद्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.3
कारागृहातील महिला कैद्यांची दोन टप्प्यात तपासणी करण्यात आली. त्यात चार कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत येथे १० दिवसांत ४३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App