अंगदान करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव खुमसिंह साेळंकी असे आहे. त्यांचे हृदय मुंबईला हवाई मार्गाने पाठविण्यात आले.41-year-old farmer’s posthumous organ donation; Four people, including Chimukali, will be revived
वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईच्या एका रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुकलीला जीवनदान मिळाले आहे.या चिमुकलीला एका ४१ वर्षीय शेतकऱ्याचे हृदय प्रत्याराेपित करण्यात येणार आहे.शेतकऱ्याचे मरणाेपरांत अंगदान करण्यात आले. त्यामुळे या मुलीसह आणखी चार जणांना नवजीवन मिळणार आहे.
मुंबईत उपचार घेत असलेल्या मुलीचे हृदय आणि आजूबाजूचे अवयवांची जागा असामान्य पद्धतीने माेठी झाली आहे, तर अंगदान करणाऱ्या शेतकऱ्याच्या हृदयाचा आकार लहान आहे. त्यामुळे वयस्क व्यक्तीचे हृदय प्रत्याराेपित करण्याची शक्यता बळावली.इंदूरच्या शासकीय महात्मा गांधी स्मृती चिकित्सा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. संजय दीक्षित यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ही एक दुर्लभ शस्त्रक्रिया असेल.
अंगदान करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव खुमसिंह साेळंकी असे आहे. त्यांचे हृदय मुंबईला हवाई मार्गाने पाठविण्यात आले. साेळंकी हे २८ नाेव्हेंबरला रस्ते अपघातात गंभीररीत्या जखमी झाले हाेते. त्यांना मंगळवारी ब्रेन डेड जाहीर करण्यात आला आहे.
साेळंकी यांचे कुटुंबीयांनी आपले दु:ख सारून बाजूला सारून त्यांच्या अंगदानासाठी सहमत झाले. साेळंकी यांचे लिव्हर आणि दाेन किडनी इंदूर येथील तीन गरजू रुग्णांना देण्यात येत आहेत, तर फुप्फुस हैदराबाद येथील एका रुग्णाला देण्यात येणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App