कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचे ४० फूट उंच आणि १०० फूट रुंद भव्य पोस्टर, कर्नाटक सरकराचा निषेध


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवमय वातावरणात काल कोल्हापुरात छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांचे 40 फूट उंच आणि 100 फूट रुंद भव्य पोस्टर झळकवण्यात आले. नुकताच कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. यानंतर संपुर्ण महाराष्ट्रातून तसेच भारतातून या घटनेविरूद्ध निषेध व्यक्त करण्यात आला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी ह्या कृत्यावर मत मांडताना म्हटले होते की ही घटना अतिशय क्षुल्लक घटना आहे.

40 feet tall and 100 feet wide poster of Chhatrapati Shivaji Maharaj in Kolhapur, protest of Karnataka government


SHIVAJI MAHARAJ : पुणेकर प्रसाद तारेंनी शोधलं छत्रपती शिवाजी महाराजांच अप्रकाशित चित्र ; फ्रान्समधील सॅव्ही कलेक्शनमध्ये मौल्यवान खजिना; पहा महाराजांचे हे खास फोटो ….


त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली होती. या सर्व पाश्र्वभूमीवर कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांच्या भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. साउंड सिस्टीमवर महाआरती म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले.

40 feet tall and 100 feet wide poster of Chhatrapati Shivaji Maharaj in Kolhapur, protest of Karnataka government

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात