एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्ट : ३८ नाराज आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, याचिकेत दावा; राज्यपालांनाही पत्र!!


वृत्तसंस्था

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहोचला असून एकनाथ शिंदे यांच्या समवेत असलेल्या 38 आमदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा मागे घेतल्याचा दावा याचिकेत केला आहे. त्यामुळे आता सरकार अल्पमतात आल्याचा दावाही याचिकेत केला आहे. 38 disgruntled MLAs support Thackeray government, claims in petition

त्याचबरोबर शिवसेनेच्या 39 आमदारांच्या सहीचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना देखील त्याचवेळी पाठविले आहे.

  •  एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेत विविध दावे केले आहेत.
  •  त्यामध्ये आपलीच शिवसेना ही खरी विधिमंडळ पक्ष आहे. आपल्याला 38 सदस्यांचा पाठिंबा आहे.
  •  त्यामुळे शिवसेना नावाच्या पक्षाने अजय चौधरी यांची गटनेतेपदी केलेली नियुक्ती बेकायदा आहे.
  •  शिंदे गटाच्या 16 आमदारांना उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी आमदारकी रद्द करण्यासंदर्भात पाठवलेली नोटीस बेकायदा आहे.
  •  16 आमदारांना प्रत्यक्षात 7 दिवसांची मुदत देणे अपेक्षित असताना 48 तासांची मुदत दिली आहे.
  •  असे अनेक दावे एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात केले आहे 38 आमदारांची एकत्रित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्याचबरोबर या 38 आमदारांनी स्वतंत्र याचिका देखील सुप्रीम कोर्टात सादर केल्या आहेत.
  •  महाविकास आघाडी सरकार विधानसभा उपाध्यक्षांचा दुरुपयोग करत असल्याचा दावा शिवसेनेच्या नाराज आमदारांनी केला आहे.

38 disgruntled MLAs support Thackeray government, claims in petition

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात