वृत्तसंस्था
मुंबई : देशभरात घातक ड्रग्स विरुद्ध सुरू असलेली कारवाई वेगात सुरू असून आज महाराष्ट्रातील महसूल खात्याच्या गुप्तचर विभागाने मुंबईतील वाशी मध्ये तब्बल 1476 कोटी रुपयांची ड्रग्स पकडली आहेत.207 kg of drugs worth Rs 1476 crore hidden in imported orange boxes caught in Vashi!!
इम्पोर्टेड संत्र्यांच्या खोक्यांमध्ये लपवून आणलेली ही ड्रग्स वेगवेगळ्या स्वरूपाची होती. यामध्ये 198 किलो हायली प्युअर क्रिस्टल मेटाफेंटाइन high purity crystalmethamphetamine (ice) आणि 9 किलो हायली प्युअर कोकेन high purity cocaine यांचा समावेश होता. महाराष्ट्राच्या महसूल गुप्तचर विभागाच्या Directorate of Revenue Intelligence (DRI) ने ही सगळी ड्रग्स जप्त केली आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेली ही ड्रग्स इम्पोर्टेड संत्र्यांच्या Valencia oranges खोक्यांमध्ये लपवली होती. ही संत्री आयात करणाऱ्या व्यापाऱ्याची माहिती महसूल विभागाच्या गुप्तचर खात्याला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वाशी मार्केटच्या आसपास संबंधित ट्रकवर अधिकाऱ्यांनी सापळा रचून छापा घातला. त्यावेळी ट्रकच्या विशिष्ट भागात ठेवलेल्या खोक्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आढळून आली. संबंधित व्यापाऱ्याला अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
गुजरातच्या विविध बंदरांमध्ये आतापर्यंत हजारो कोटींची ड्रग्स पकडली गेली आहेत. मुंबईत वाशी मार्केटच्या आसपास तब्बल 1400 कोटी रुपयांची ड्रग्स आढळण्याचा हा पहिला प्रकार आहे. संबंधित व्यापाऱ्याच्या चौकशी आणि तपासात आणखी महत्त्वपूर्ण माहिती आणि या गुन्ह्याचे धागेदोरे मिळणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App