वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले तरी शिंदे – फडणवीस सरकारला धोका नसल्याचा निर्वाळा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरे गटाने आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पुन्हा एकदा निवेदन दिले. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारला धोका नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.16 MLAs are disqualified, there is no threat to the Shinde-Fadnavis government; Nirvana of Ajitdad
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर 16 आमदार अपात्र हवेत यासाठी ठाकरे गट आकाश पातळ एक करत आहे. शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नेत्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना त्या आमदारांच्या अपात्रतेबाबत आजच पुन्हा एकदा पत्र दिले आहे.
पण या पार्श्वभूमीवर अजितदादांनी मात्र वेगळा सूर लावत 16 आमदारांच्या अपात्रतेचा शिंदे – फडणवीस सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण त्यांच्याकडे बहुमत आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि अजित दादा यांच्यातले मतभेद पुन्हा समोर आले आहेत.
Maharashtra | "Even if 16 MLAs are disqualified, the government of Shinde and Fadnavis will not fall. There is no threat to the government," says NCP leader Ajit Pawar pic.twitter.com/CUR0WnLeEB — ANI (@ANI) May 15, 2023
Maharashtra | "Even if 16 MLAs are disqualified, the government of Shinde and Fadnavis will not fall. There is no threat to the government," says NCP leader Ajit Pawar pic.twitter.com/CUR0WnLeEB
— ANI (@ANI) May 15, 2023
कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक होऊन त्यामध्ये वज्रमूठ सभा पुन्हा सुरू करण्याच्या करण्याचा खल झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी पुन्हा जोमात आल्याचा निर्वाळा दिला. पण त्याला 24 तास उलटून गेले ना तोच अजितदादांनी 16 आमदारांच्या निलंबनाबाबत वेगळा सूर लावून महाविकास आघाडीत मतभेद अजून कायम असल्याचे दाखवून दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App