पुन्हा मृत्यूचे तांडव : विरारमधील कोविड सेंटरला भीषण आग; ICUमधील १५ पैकी १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू

13 people have died in a fire broke out at Vijay Vallabh COVID care hospital in Virar

fire broke out at Vijay Vallabh COVID care hospital : पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेतील विजय वल्लभ कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी आयसीयूमध्ये 15 रुग्ण होते. संपूर्ण केंद्रात 90 रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ऑक्सिजनवर असलेल्या 21 रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे 3.25 वाजता ही आगीची घटना घडली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. हे कोविड सेंटर दुसर्‍या मजल्यावर आहे. आगीचे कारण एसीमधील शॉर्टसर्किट असल्याचे बोलले जात आहे. fire Sets A Blaze at Covid Center in Virar West; 13 corona Patients Died


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेतील विजय वल्लभ कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी आयसीयूमध्ये 15 रुग्ण होते. संपूर्ण केंद्रात 90 रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ऑक्सिजनवर असलेल्या 21 रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे 3.25 वाजता ही आगीची घटना घडली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. हे कोविड सेंटर दुसर्‍या मजल्यावर आहे. आगीचे कारण एसीमधील शॉर्टसर्किट असल्याचे बोलले जात आहे.

रुग्णांच्या कुटुंबीयांचा असा आरोप आहे की, जेव्हा आग लागली तेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णांना आत सोडून बाहेर धाव घेतली. अशा परिस्थितीत त्यांनी (कुटुंबीयांनी) स्वत: मध्ये जाऊन रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघाताच्या वेळी दोन परिचारिका आयसीयूमध्ये हजर असल्याचे बोलले जात आहे. रात्री रुग्णालयात डॉक्टर होते असा दावा रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शहा यांनी केला. परंतु अपघाताच्या वेळी किती कर्मचारी ड्युटीवर होते, असे त्यांना विचारण्यात आले होते, यावर त्यांना योग्य आकडा देता आला नाही.

दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये मृत्युतांडव

नाशिकमधील सरकारी रुग्णालयात बुधवारी मोठा दुर्घटना झाली होती. येथील महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने दुरुस्तीसाठी 30 मिनिटे लागली. या संपूर्ण काळात ऑक्सिजनचा पुरवठा थांबलेला होता. यामुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा थांबला तेव्हा तेथे 171 रुग्ण ऑक्सिजनवर होते, तर 67 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.

13 people have died in a fire broke out at Vijay Vallabh COVID care hospital in Virar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात