विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी, वेल्हे आणि हवेली या तीन तालुक्यांतील एकूण २४ गावांलगतच्या वाड्या-वस्त्यांवर वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 12 crore sanctioned for electricity in 24 villages
मुळशी तालुक्यातील वेगरे, कोंदूर, मोसे-दादवली, अडमाळ-पासलकर वस्ती, वांजळे-रामवाडी, जताडे-कुडलेवस्ती, पोमगाव-कातर वस्ती या सात ठिकाणी तसेच वेल्हे तालुक्यातील धिसर-ढेबेवस्ती, धानेप-धनगरवस्ती, घावर-घावरवाडीवस्ती, भागीनघर-वाडीवस्ती, भट्टी-वाघदरा-ढेबेवस्ती, सुरवड-वाडीवस्ती, माणगाव-कुंभतलवस्ती, रुळे-काळूबाईचा वाडा, शिरकोली-घरकूलवस्ती, कुरण-मोरेवस्ती, खामगाव-तळजाईवस्ती, वरोती-जननीमाता मंदिर, कोंढवली-स्मशानभूमी, केतकावणे-स्मशानभूमी, दादवडी-वस्ती, वरघड-बिरोबावाडी या सोळा ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे.
Electricity crisis : चीननंतर आता भारतातही वीज संकटाची चाहुल, काय आहेत कारणे, खाणींमध्ये किती उरलाय कोळसा… वाचा सविस्तर…
पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीमधून खास बाब म्हणून बारा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सततच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर करण्यात आला. मुळशी आणि वेल्हे तालुक्यांतील विशेषतः डोंगराळ आणि दुर्गम गावांत विजेचे प्रश्न असून सुळे पाठपुरावा करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App