अकरावीच्या प्रवेशासाठी तब्बल ११ लाख विद्यार्थी देणार सीईटी परीक्षा


विशेष प्रतिनिधी

मुंबई – अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या नोंदणीची अंतिम आकडेवारी राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केली आहे. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती मंडळाने दिली.11 lack students will give CET

अकरावीच्या सीईटी साठी सर्वाधिक नोंदणी ही मुंबई विभागातून करण्यात आली आहे. त्यामध्ये २ लाख ६३ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केला होता, त्यापैकी २ लाख ५५ हजार ६४३ विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण भरलेले आहेत. त्याखालोखाल पुणे, नाशिक, औरंगाबाद या विभागातून एक ते दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी अकरावी सीईटीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया केली होती.



राज्य शिक्षण मंडळाकडून २० जुलैपासून अकरावी सीईटीच्या नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. ही नोंदणी पुन्हा २६ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीमध्ये करण्यात आली. या मुदतीत १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण भरलेले असल्याने या विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता येणार आहे.

11 lack students will give CET

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात