केंद्र सरकारने आम्हाला मार्गदर्शन करावं. दहावीचा निर्णय आम्ही घेतला, बारावीचा पण आम्ही घेणार आहोत. पण तो निर्णय देशभर सारखा पाहिजे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांचा निर्णय घेतला. 10 वी च्या परीक्षा रद्दच करण्यात आल्या आहेत .आता त्यानुसार मुल्यांकन करुन त्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे. त्याप्रमाणेच बारावीच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. मात्र, यासाठी देशभरात एक धोरण असावं. म्हणून पंतप्रधान मोदींनी भारतासाठी एक परीक्षा धोरण करावं,” अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. 10th exam canceled! Prime Minister Modi should make an exam policy for India regarding 12th; Chief Minister Thackeray’s demand to Prime Minister Modi
उद्धव ठाकरे म्हणाले, “10 वीच्या परीक्षांबाबतीत आपण निर्णय घेतलाय. यावर्षी 10 वीची परीक्षा न घेता आपण मुल्यांकन करुन त्या त्या प्रमाणे पास करणार आहोत. 12 वीचा देखील निर्णय घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षांचाही आपण आढावा घेत आहोत. त्यासाठी काय पद्धत ठरवता येईल ती ठरवून लवकरात लवकर हाही निर्णय घेणार आहोत. बारावीच्या परीक्षेवर पुढचं शिक्षण अवलंबून असतं. यात नीटची, इंजिनियरींगच्या परीक्षेचा समावेश आहे. इतर राज्यात जाऊन शिकण्याची वेळ येते. त्यासाठी केंद्र सरकारने देखील एक धोरण ठरवायला पाहिजे.”
ज्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आणि पुढील शैक्षणिक गोष्टींवर परिणाम करणार आहेत त्याबाबत पंतप्रधान मोदींनी देशासाठी धोरण ठरवावं अशी विनंती करतो. मी या आधीही ही मागणी केली होती. बोलायचं असेल तर बोलेल ,पत्र पाठवायचं असेल तर तेही मोदींना पाठवेल,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“बारावीच्या परीक्षा किंवा इतर परीक्षा ज्यांचे देशात पडसाद उमटणार असतील त्यासाठी देशात एक शैक्षणिक धोरण असायला हवं. हा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. केंद्र सरकारने आम्हाला मार्गदर्शन करावं. दहावीचा निर्णय आम्ही घेतला, बारावीचा पण आम्ही घेणार आहोत. पण तो निर्णय देशभर सारखा पाहिजे. नाही तर एका राज्यात परीक्षा होईल आणि एकात नाही. यात विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? यात एक समानता असली पाहिजे,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App